You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी आरक्षण जाहीर

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी आरक्षण जाहीर

वेंगुर्ला :

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ अ. ही जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित झाली आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंडगे यांनी हे आरक्षण जाहीर आले.

यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक १ ब. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक २ अ. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक २ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अ. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ३ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ अ. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ४ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ अ. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ५ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ अ. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ६ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ अ. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, प्रभाग क्रमांक ७ ब. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ८ अ. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक ८ ब. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ अ. अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ ब . सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १० अ. सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक १० ब . सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

आरक्षण सोडतीवेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच प्रसन्ना कुबल, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे, सचिन वालावलकर, भूषण सारंग, सत्यवान साटेलकर, नितीन कुबल आधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा