रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना धान्यवाटप; संजू परब यांनी दिली माहिती
सावंतवाडी : शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडी शिवसेनेच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू कुटुंबांना धान्यवाटप असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
श्री. केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी असून, त्यानिमित्त सावंतवाडी व सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संजू परब यांनी आज येथे दिली.
