You are currently viewing दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणेंनी उचललेले पाऊल स्वागतार्ह; पारंपरिक दशावतार संघाचे आभार

दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणेंनी उचललेले पाऊल स्वागतार्ह; पारंपरिक दशावतार संघाचे आभार

दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणेंनी उचललेले पाऊल स्वागतार्ह; पारंपरिक दशावतार संघाचे आभार

शासनाचे पॅकेज थेट कलावंतांपर्यंत पोहोचावे; कुडाळ येथील पत्रकार परिषदेत मागणी

कुडाळ

दशावतार कलावंतांना राजाश्रय मिळावा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी विधानसभेत आवाज उठविल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे आम्ही शतशः आभारी आहोत, अशी भावना सिंधुदुर्ग पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघाने व्यक्त केली. तसेच शासनाने जाहीर करावयाचे कोणतेही पॅकेज थेट कलावंतांपर्यंत पोहोचेल, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, संतोष रेडकर, चारू मांजरेकर, पप्पू नांदोसकर, विलास तेंडोलकर, सुरेश गुरव, प्रसाद शिरोडकर, यश जळवी, गुरु मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, दत्तप्रसाद शेणई, उदय मोर्ये, नारायण आशयेकर, महेश गवंडे, निळकंठ सावंत, सुधीर परब आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर म्हणाले की, अनेक वर्षांपासून दशावतार कलावंत आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र शासनाकडून अपेक्षित पावले उचलली जात नव्हती. अशा परिस्थितीत आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत कलावंतांचा आवाज बनून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल संघातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, प्रमोद जठार, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचेही आभार मानण्यात आले.
संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी सांगितले की, शासनाकडून जाहीर होणाऱ्या पॅकेजचा प्रत्यक्ष लाभ अनेकदा कलावंतांऐवजी दशावतार कंपन्यांच्या मालकांना मिळतो. प्रत्यक्षात बुटांपासून मुकुटापर्यंतचा वेशभूषेचा खर्च, रंगभूषा आणि इतर साहित्याचा खर्च कलावंतांनाच करावा लागतो. त्यामुळे भविष्यात जाहीर होणाऱ्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष कलावंतांचा विचार करून आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात पोहोचेल, यासाठी शासन आणि संबंधित समितीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा