भात पिकावरील कीड रोगांचे नियंत्रणाविषयी

भात पिकावरील कीड रोगांचे नियंत्रणाविषयी

सावंतवाडी तालुक्यात प्रात्यक्षिक

सिंधुदुर्गनगरी :
सध्याच्या हवामानामुळे जिल्ह्यात भात पिकावर निळे भुंगेरे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत कृषि विभाग व कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत फळ संशोधन केंद्रस वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांनी सावंतवाडी येथे कीड रोग नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व फवारणी प्रात्यक्षिक घेतले.

यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय कृषि अधिकारी अजित अडसूळ, फळसंशोधन केंद्र, वेंगुर्लेचे सहयोगी संचालक श्री. बी.एन.सावंत, किटक शास्त्रज्ञ दळवी सर, विजय देसाई, तालुका कृषि अधिकारी माधुरी मुटके, कृषि पर्यावेक्षक श्री. वाघमारे, कृषि सेवक श्रीमती देसाई व श्री चव्हाण आदी उपस्थित होते.

भुंगेरे गडद निळ्या रंगाचे असून अळी ही भूरकट रंगाची असते. या किडीच्या आळी व प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरडवून टाकते. त्यामुळे पानांवर पांढरेपट्टे दिसून येतात. या किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अवाजवी वापराने होऊ शकतो. तरी ही कीड नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा लॅमडासायलोहेथ्रीन 5 टक्के प्रवाही 5 मिली या किटकनाशकांची 10 ली. पाण्यातून फवारणी करावी. तसेच करपा रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.25 टक्के किंवा कार्बेन्डॅझिम 0.10 टक्के 25 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यातून फवारावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा