You are currently viewing पावसाळी आपत्तीवेळी प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज

पावसाळी आपत्तीवेळी प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज

पावसाळी आपत्तीवेळी प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन; सेवाभावी उपक्रमांचे कौतुक, दिव्यांगांसाठी सहकार्याचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज असल्याचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना भेटून सादर केले.
यावेळी प्रा. बागवे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. प्रतिष्ठानच्या गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या सेवाभावी कार्याचा आढावा घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यानंतर उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रतिभा वराळे यांचीही भेट घेण्यात आली. सावंतवाडी समाज मंदिर येथे दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग मुलांना मिळवून देण्यासाठी सहकार्याची विनंती केली. त्यावर दिव्यांग मुलांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी वराळे यांनी दिले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही नोंदणीकृत संस्था असून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांपासून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना २४ तास विनामूल्य सेवा पुरविण्याचे काम संस्था करत आहे. वादळी पावसात रस्त्यावर किंवा घरांवर पडलेली झाडे स्वखर्चाने हटविणे, पूरग्रस्त भागात तातडीने मदतकार्य राबविणे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
यंदाच्या पावसाळ्यातही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनासोबत समन्वय साधून मदतकार्य करण्याची तयारी संस्थेने दर्शविली आहे.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि रवि जाधव उपस्थित होते.

_________________________
*संवाद मीडिया* 

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*

*• Duration : 4.5 Years*

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*

*पत्ता:*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*

*संपर्क:*

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा