You are currently viewing ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीर

ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीर

ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीर

 सिंधुदुर्गनगरी

 सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय  तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसनविकास मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर गुरुवार दि 9 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत भ. ता. च. म. माध्यमिक विद्यालय, चौके येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरीकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

 या शिबिराच्या सकाळच्या सत्रात योगशिबीर, ध्यानसत्र, मानसिक आरोग्य व समुपदेशन, आहार मार्गदर्शन, व्यायाम व प्रात्यक्षिके, आनंदी जीवनशैली याविषयी फिजिओथेरपिस्ट, योग प्रशिक्षक, आहारतज्ञ, आरोग्य समुपदेशक आदी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर तज्ञ डॉक्टर ज्येष्ठ नागरीकांची बीपी, शुगर, नाक, कान, डोळे, घसा तपासणी, इसीजी, सीबीसी, रक्ततपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा