*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*वाचनं ज्ञानदं बाल्ये,यौवनं शीलरक्षकम्।*
*जरावस्थे दुःखहरणं,हितं सद् ग्रंथवाचनम्।।*
*(सुभाषित विवेचन)*
बालपण…
मला आठवते, ३/४ थीत असेन कदाचित मी.
शाळेमध्ये पुस्तकांची एक लोखंडी पेटी पुस्तकांनी गच्च भरून येत असे. पेटी उघडताच
मी हरवून गेले होते. कारण त्यातली पुस्तके.
पुस्तकांची नावे आता आठवत नाही पण लेखिकेचे नाव दिसले, सरोजिनी बाबर. अजून
मला डोळ्यांसमोर दिसते ती पेटी व ते नाव. नंतर
आठवते ते, शामची आई हे नाव. मी इतकी लहान
होते की काही आठवत नाही. नंतर दिसतात ती
“चांदोबातील चित्रं”. कारण त्यातील अक्राळविक्राळ भितीदायक झाडे व खांद्यावर
लटकलेला वेताळ. ती सारी चित्रे बघण्यात व
चांदोबा पुन्हा पुन्हा पाहण्यात मला आनंद होत असे. अशी झाडे अस्तित्वात असतात? यावर माझा
मुळीच विश्वास नव्हता पण २००८ सालच्या
चार महिने इंग्लंड वास्तव्यात मी मॅकडोनाल्ड इस्टेट या अनेक एकर बगिच्यात ही झाडे प्रत्यक्ष
पाहिली व अचंबित झाले. तुम्ही म्हणाल ते निसर्गात अस्तित्वात आहे याचा मला प्रत्यय आला. तर अशा या संस्कारक्षम पुस्तकांनी आमचे बालपण घडवले. शिवाय वर्गात शिकवले
जाणारे लेखकही नामांकित होतेच. शाळेत दररोज प्रार्थनेसमोर मला पेपरमधील एक बातमी
वाचून दाखवावी लागे. कारण गावात पेपर फक्त
आमच्या घरीच येत असे. त्यामुळे नकळत मला
पेपर वाचनाची सवय लागली. मी ८/९ वीत असतांना इंदिरा गांधी नभोवाणी मंत्री झाल्याचा
त्यांचा नऊवारीतला फोटो अजून मला डोळ्यांसमोर दिसतो. त्यावेळीही व्हिएतनाम, की? कोरिया? युद्धाचे फोटो पाहिल्याचे व वाचल्याचे मला आठवते. एका खेड्यातील मुलगी ह्या सगळ्या
वाचनाने घडत होती जी आज तुमच्यासमोर
आत्मविश्वासाने उभी आहे.. गावात साने गुरूजी,
विनोबाजी भावे, शंकरराव देव, चिंतामणराव देशमुख अशा महान व्यक्ती येऊन गेल्या तो ही
संस्कार आमच्या मनावर नकळत घडला असावा.
आणि शाळा व शिक्षक तर उत्तम होतेच. असे हे
आमचे बालपण सुंदर घडले यात वादच नाही.
तारुण्य…
११ नंतर शहरात शिकायला गेलो. प्र के अत्रे व
मा. राधाकृष्णन यांचे भाषण अगदी जवळून
ऐकण्याचे व त्यांना प्रत्यक्ष बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पीडी एफ वाय ला तर अख्खी
SSVPS ची लायब्ररीच माझ्या हाती लागली.
अत्रे, फडके, खांडेकर,माडखोलकर, ना स इनामदार, पु लं, ह ना आपटे, ना ह आपटे अशा
नामांकित लेखकांना मी झपाटल्या सारखे वाचलेच पण लग्नानंतरही वाचनात खंड पडला
नाहीच. तत्कालीन सर्व मराठी लेखक जयवंत
दळवी ते शिवाजी सावंत, रणजित देसाई सारेच
मी वाचले. आमचे तारुण्य या लेखकांनी घडवले.
पुस्तकांनीच सतत सोबत केली.आम्ही उत्तम घडलो व अनेक उत्तम पिढ्या घडवल्या.
आणि आता उतारवयातही पुस्तकेच सोबत करत
आहेत. आमच्या नसानसात पुस्तकेच आहेत. प्रचंड वाचले व वाचत आहोत. अरुणा ताईंनी
दिलेल्या श्लोकाबरहुकुम आमचे वाचन व आयुष्य चालले आहे म्हटले तरी चालेल.किती नि
काय वाचले याची गणतीच नाही. यादी केली तर
दोन दिवस लागतील तरी सर्व आठवणार नाहीच.
ताई, तुम्ही म्हणता ते खरेच आहे. बालपणात
वाचनातून ज्ञानानंद,
तरूणपणात शीलसंवर्धन
व वृद्धावस्थेत दु:खहरणासाठी ग्रंथच उपयुक्त
असतात.सद् ग्रंथांच्या वाचनाने हित साधते, नक्कीच!
धन्यवाद ..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
