You are currently viewing भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषी दिनानिमित्त वडाचे झाड लावले

भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषी दिनानिमित्त वडाचे झाड लावले

भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषी दिनानिमित्त वडाचे झाड लावले

महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

सावंतवाडी

भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषीदिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या हस्ते वटवृक्षाचे झाड लावण्यात आले हॆ झाड सभापती दिपाली भालेकर यांनी आपल्या घरी गेली चार वर्ष छान कुंडीत लावून त्याचे जतन केले होते आणि आज कृषिदिनानिमित्त आपल्या महिलासाठी सार्वजनिक ठिकाणी ते लोकार्पण केले आहे.
भविष्यात आसपासच्या महिला भगिनींना वटवृक्षाची पूजा करण्यास लांब जावे लागणार नाही हा उद्देश ठेऊन हॆ झाड लावण्यात आले आहे.
झाड लावताना सर्व महिला भगिनी आनंदित झाल्या होत्या.
यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ.दिपाली भालेकर, सौ,अनुजा पिंगुळकर, सौ.सुनीता कुडाळकर,सौ.दीपा गावडे,सौ.नम्रता कदम, सौ.रूपाली सुभेदार. सौ,आरती सुभेदार,सौ.रामेश्वरी सुभेदार, सौ.अंकिता सुभेदार, सौ.उमिका गावडे, सौ.संगीता सुभेदार, सौ.रेखा कांडरकर. सौ. गुंजन गावडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा