You are currently viewing पालकमंत्री रविंद्र चव्हाण 4 ते 6 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री रविंद्र चव्हाण 4 ते 6 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी :

 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी 6 .50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता ओरोस शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, ओरोस. दुपारी 12 वाजता डॉ. निलेश राणे, माजी खासदार यांचे समवेत बैठक (सा.वा.विभाग व वन विभाग) स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय,कॉन्फरन्स हॉल, ओरोस. दुपारी 1 वाजता सिंधुदुर्ग विभागीय परिवहन विभागा समवेत बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, कॉन्फरन्स हॉल,ओरोस. दुपारी 1.30 ते 2.30 पर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता ओरोस येथून कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 5.30 वाजता कणकवली येथे आगमन व कणकवली नगर पंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे उद्घाटन. सायं. 6 वाजता कणकवली नगर पंचायत कार्यालयास भेट. सायं. 6.30 वाजता कणकवली येथून केसरी ता.सावंतवाडी निवासस्थानाकडे प्रयाण. रात्री 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

 

शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी निवासस्थान येथून कुडाळ कडे प्रयाण. सकाळी 9 वाजता कुडाळ येथे आगमन व जीवन संजिवनी सेवा ट्रस्ट आनंदश्रयाचा 7 व्या वर्धापनदिनास उपस्थिती.सकाळी 9.45 वाजता कुडाळ येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

 

शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वाजता गोवा (दाबोलिम) एअरपोर्ट, गोवा येथे आगमन व सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता सिंधुदुर्ग येथे आगमन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- श्री. इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल, ओरोस फाटा, आरटीओ ऑफीस जवळ,ओरोस. सकाळी 9.30 वाजता ओरोस येथून कोलगाव ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कोलगाव ता. सावंतवाडी येथे आगमन व सावंतवाडी कोलगाव येथील पुलाचे भुमिपूजन स्थळ:- कोलगाव ता. सावंतवाडी. सकाळी 10. 15 वाजता कोलगाव ता. सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता ओरोस येथे आगमन व जिल्हा कृषि विभाग आढावा बैठकीस उपस्थिती स्थळ:- भाजपा जिल्हा कार्यालय, वसंतस्मृती, ओरोस. दुपारी 12.30 वाजता जिल्हा भाजपा कार्यकर्ता गाठी – भेटी व निवेदन स्विकारणे स्थळ:- भाजपा जिल्हा कार्यालय, वसंतस्मृती, ओरोस. दुपारी 1.30 वाजता राखीव दुपारी 2.30 वाजता ओरोस येथून वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथे आगमन व वेंगुर्ला नगरपरिषद सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, नगरपरिषद, वेंगुर्ला. दुपारी 4.15 वाजता वेंगुर्ला येथून कुडाळकडे प्रयाण. सायं. 5 वाजता कुडाळ येथे आगमन व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. स्थळ :- पावशी ता.कुडाळ सायं. 6.15 वाजता पावशी येथून घावनळे ता.कुडाळ कडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता घावनळे येथे आगमन व घावनळे शाळा सुवर्ण महोत्सव समारोप समारंभास उपस्थिती सायं.7 वाजता घावनळे येथून कुडाळ रेल्वेस्टेशन कडे प्रयाण रात्री 8.30 वाजता कुडाळ रेल्वेस्टेशन येथे आगमन व कोकणकन्या (20112) एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा