You are currently viewing वाढदिवस अभिष्टचिंतन – .नगरसेविका सौ. ज्योती रमाकांत जाधव

वाढदिवस अभिष्टचिंतन – .नगरसेविका सौ. ज्योती रमाकांत जाधव

वाढदिवस अभिष्टचिंतन

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी.

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!

मोठया मनाचं हळव नेतृत्व…नगरसेविका सौ. ज्योती रमाकांत जाधव यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!

माणसा-माणसांच्या मनामध्ये घर करून बसलेलं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व! अशा मोठ्या मनाच्या परंतु हळव्या माणसा विषयी मनात घर करणाऱ्या आणि काळजात साठवलेल्या काही आठवणी. सौ. ज्योती रमाकांत जाधव यांचा 1 मार्च रोजी जन्मदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा…

सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. फुले,आंबेडकरी चळवळी मध्ये सक्रिय असणारे श्री.रमाकांत जाधव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना पतीला सर्वतोपरी चळवळीत सहकार्य करत त्यांच्या जीवनातील अनेक चढ उतारांच्या त्या साक्षीदार बनल्या. श्री.जाधव हे फुले आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत राहिल्याने त्यांच्या विचारांशी सौ.जाधव एकरूप राहून कौटुंबिक जबाबदारी बरोबर सामाजिक बांधीलकीच भान ठेऊन त्या काम करू लागल्या.

एका वर्षापूर्वी झालेल्या कसई दोडामार्ग नगर पंचायत निवडणूकित सौ. ज्योती जाधव या भरघोस मतांनी निवडून आल्या आणि नगरसेविका म्हणून सभागृहात त्यांना प्रवेश करता आला. त्यानंतर त्यांची महिला व बाल कल्याण सभापती पदावर निवड झाली. सभापती पदावर कार्यरत असताना अनेक विकासाचे प्रश्न सोडवीत असताना अलीकडेच त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत शिक्षक भारती या संघटनेने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानीत केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री मा.ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चळवळीत कार्यरत असलेले रमाकांत जाधव हे मा.नाम.आठवले यांचे विश्वासू व एकनिष्ठ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिचित आहेत. चळवळीच्या माध्यमातून श्री. जाधव हे समाज प्रबोधनाचे कार्य करत असताना सामाजिक अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवून समाजाला जागृत आणि संघटित करण्याच काम करत आहेत.गेली कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा समाजामध्ये निर्माण करून ते समाजहितासाठी झटत आहेत. त्यांचा त्याग आणि योगदान अशी राजकीय पार्शवभूमी सौ. ज्योती जाधव यांना लाभली. सौ.ज्योती जाधव यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

संवाद मीडिया करून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =