You are currently viewing सार सात फेऱ्यातले

सार सात फेऱ्यातले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’सार सात फेऱ्यातले’*

 

झाड वडाचे देतसे

प्राणवायू जगताला

त्याच्या छायेत बसता

मिळे आरोग्य देहाला ||

 

ज्ञानी धर्मज्ञ सावित्री

जाणे तत्व जगण्याचे

तुष्टविले यमराजा

देई उत्तर धर्माचे ||

 

सात जन्माची पुण्याई

एकमेका साथ देणे

व्रत साहचर्य नित्य

सुखी संसार करणे ||

 

नेम नियम पाळण्या

सार जाणुनिया घेऊ

दोन जीवांचे एकत्व

नित्य निभावून नेऊ ||

 

नसे उच्च नीच कोणी

टाका पाऊले जोडीने

सावित्रीची कथा सांगे

सौख्य दोघांच्या गोडीने ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा