You are currently viewing कुडाळमध्ये ५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर

कुडाळमध्ये ५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर

सावंतवाडी : येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुद्धिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा, त्यामधून मिळणारे गुण, होणारे फायदे याविषयी शिबीरात मार्गदर्शन केले जाईल.

मागील दहा वर्षे मुक्ताई ॲकेडमी जिल्ह्यातील शालेय विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीरे, स्पर्धा, इत्यादी उपक्रम घेत आहे. ॲकेडमीचे अनेक विदयार्थी – विदयार्थिनी शालेय आणि असोसिएशनच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त आहेत. मुक्ताई ॲकेडमीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळाले आहेत. नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर, मोबाईल क्रमांक ८००७३८२७८३ यावर संपर्क करायचा आहे. विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या शिबीरात सहभाग घेण्याचे आवाहन श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा