You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास झाल्यास राज्याच्या तिजोरीत भर पडून बेरोजगारांना काम मिळेल – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास झाल्यास राज्याच्या तिजोरीत भर पडून बेरोजगारांना काम मिळेल – राजन तेली

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास झाल्यास राज्याच्या तिजोरीत भर पडेल आणि विशेष म्हणजे येथील बेरोजगारांच्या हातांना काम मिळेल. त्यामुळे त्या दृष्टीने जिल्ह्यात बारमाही पर्यटन यशस्वी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहेत, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आपण पंचतारांकित सुविधा कशा देता येतील या दृष्टीने देखील हॉटेल व्यवसायिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. राजकीय पदाधिकाऱ्यांनी वाद बाजूला ठेवून पर्यटनासाठी एकत्र यावे आणि येथील विकास साधावा, असेही श्री. तेली म्हणाले. आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी, पर्यटन महामंडळाचे हनुमंत हेदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सिंधुदुर्ग पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, आंबोली माजी सरपंच शशिकांत गावडे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच सदाशिव नार्वेकर, महेश पावसकर, शंकर चव्हाण, दीपक नाटलेकर, काशीराम राऊत, रसिका गावडे, साक्षी गावडे, छाया नार्वेकर, निधी गुरव, अमित कामत, अनंत गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 3 =