You are currently viewing कनिष्ठ अभियंता जिवन चराठे यांचा निषेध…….

कनिष्ठ अभियंता जिवन चराठे यांचा निषेध…….

साटेली भेडशी सरपंच लखु खरवत यांना अपमानास्पद वागणूक

सरपंच संघटना दोडामार्ग यांनी केला निषेध

साटेली भेडशी सरपंच लखु खरवत यांना जीवे मारण्याची धमकी देणे तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक देणे याबाबत सरपंच संघटना दोडामार्ग च्या वतीने विजवीतरण चे साटेली भेडशी येथील कार्यरत कनिष्ठ अभियंता जीवन चराठे यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष पराशर सावंत यांनी जाहीर निषेध केला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सरपंच पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशी अपमानास्पद वागणूक देणे शोभत नाही, त्यामुळे या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी जेणेकरुन बेजबाबदार अधिकाऱ्यांवर याचा वचक बसेल, कोणत्याही परिस्थितीत सरपंच लखु खरवत यांच्यामागे सरपंच संघटना उभी राहणार असून या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास तालुक्यातील सर्व सरपंच उपोषणाचे हत्यार उपसतील असे स्पष्ट करण्यात आले.

या प्रसिद्धी पत्रकावर देवेंद्र शेटकर, स्नेहा गवस, संगीता देसाई, सूर्यनारायण गवस, विनायक शेटये, दिनेश नाईक, दिक्षा महालकर, संदिप नाईक, पराशर सावंत, महादेव गवस, विशांत तळवडेकर आदी सरपंचांची नावे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 7 =