You are currently viewing राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन.

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन.

मिशन आय ए एस चा उपक्रम

अमरावती

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेचा विषय छत्रपती शाहू महाराज जीवन व कार्य हा आहे. या निबंध स्पर्धेसाठी एक हजार शब्दांची शब्दमर्यादा ठेवली असून विद्यार्थ्यांनी आपले निबंध प्रा. पल्लवी काठोळे. जिजाऊ नगर. विद्यापीठ रोड. महापौरांचा बंगल्याच्या समोर. अमरावती कँम्प . 444 602 या पत्त्यावर एक जुलैपूर्वी पाठवावेत. यशस्वी स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय अशी पारितोषिके देण्यात येतील. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी आपले आपल्या निबंध इंग्रजी मराठी व हिंदी या तीन भाषांमध्ये लिहून संयोजकांकडे पाठवावे .तसेच येत्या 26 जून रोजी सकाळी नऊ वाजता पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये जिल्हा प्रशासन व सारथी पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता रक्तदान व दुपारी अकरा वाजता किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची माहिती व प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमांमध्ये रक्तदान करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालय व सारथी पुणे यांच्या वतीने दोन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व सहभागी व्यक्तींना अल्पोपहार व जलपान उपलब्ध करून देण्यात येणार आहे .या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका पत्रकान्वये केली आहे. प्रकाशनार्थ.प्रा. डॉ.नरेशचन्द्र काठोळे. संचालक मिशन आयएएस.अमरावती
.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =