वट पौर्णिमेनिमित्त मसदे-वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री सत्यनारायण महापूजा; महाप्रसाद-अन्नदानाचे आयोजन
मसदे-वडाचापाट
श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट येथे सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी वट पौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती व स्वामी पादुकांवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि पूजनाने होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. सकाळी ११ वाजता नैवेद्य व आरती होणार असून दुपारी १ वाजता महाप्रसाद व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता दैनंदिन आरतीने कार्यक्रमाची सांगता होईल.
या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
