You are currently viewing पुणे येथे प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित इंद्रायणी ग्रंथाचे प्रकाशन

पुणे येथे प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित इंद्रायणी ग्रंथाचे प्रकाशन

सावंतवाडी :

 

ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित इंद्रायणी या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता पुणे कर्वे रोड येथील श्री वासुदेव निवास येथे करण्यात येणार आहे. या निवासचे प्रधान विश्वस्त तथा नारायण रत्न व चुडामणी प पू शरदभाऊ शास्त्री जोशी महाराज यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

यावेळी वासुदेव निवासचे विश्वस्त प पू देविदास जोशी महाराज, गुजरात येथील श्री वासुदेव आश्रमचे महंत प. पू स्वामी विष्णूगिरी महाराज, कुडाळकर महाराजांचे पुणे येथील उत्तराधिकारी प पू श्रीधर महाराज बेलवलकर, कासारवाडीच्या दत्तसाई सेवा कुंजचे प्रमुख विश्वस्त प पू शिवानंद स्वामी, कोल्हापूर गुळवणी महाराज न्यासचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे, पुण्याच्या श्री भगवती सेवा आश्रमचे महंत डॉ श्याम दलाल, मॉरिशियस येथील श्री सद्गुरु सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव गंगाराम आदी उपस्थित राहणार आहेत.

आयुर्वेद आणि अध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून हजारो भक्तगणांना सद्दमार्ग दाखवणारे प्रेमानंद स्वामी महाराज माणगाव येथील माणगावचे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, परभणीचे परमपूज्य योगानंद स्वामी महाराज, कुडाळकर महाराजांचे गुरु तथा पुण्याचे प पु बाबा महाराज मांवतकर या गुरू परंपरेतील चौथ्या पिढीतले. टेंबे स्वामीची गुरुपरंपरा आणि अध्यात्म सातासमुद्रा पलीकडे नेणाऱ्या प्रेमानंद स्वामी महाराजांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस परदेशात मोठया संख्येने शिष्यवर्ग आहे. महाराजांच्या पुणे गोखलेनगर मधील पुण्यक्षेत्र श्री दत्त सदन मध्ये गेल्या ५५ वर्षांपासून वर्षभर भरगच्च कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत.

अध्यात्माचे प्रेरणास्थान असलेल्या प्रेमानंद स्वामी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन अध्यात्म आणि आयुर्वेदाला समर्पित करून हजारो भक्तांना प्रवचनाच्या माध्यमातून सद्द्मार्ग दाखविला. गुरुकृपेने आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना तसेच हजारो लोकांना व्यसनमुक्त करून अध्यात्माकडे वळवताना त्यांचे आयुष्य जीवन सुखमय केले. अनिष्ट रूढी व अंधश्रद्धांना विरोध करताना विज्ञान हाच पाया ठेवून त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले. भक्तांचे दुःख निवारण करताना त्यांना भक्ती मार्ग दाखविला. अध्यात्माच्या मार्गातून भक्तांना परमार्थाकडे नेताना त्यांचे जीवनमानही त्यांनी सुखी केले.

महाराजांचे निस्सीम भक्त अजित बनकर यांनी हा ग्रंथ संग्रहित केला आहे. महाराजांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या कार्यावर प्रकाशित टाकण्यात आला आहे. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराजांचे शिष्य व भक्त मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन पुण्याच्या श्री सद्गुरू सेवा मंडळ परिवार आणि ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने रविंद्र कुडाळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + thirteen =