You are currently viewing भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नगर परिषदेला निधीची तरतूद करावी

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नगर परिषदेला निधीची तरतूद करावी

राजू मसुरकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

जिल्हा नियोजन मध्ये तीस लाखाची निधीची तरतूद भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेला निधीची तरतूद करावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
ते म्हणाले की, सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढला असून यामध्ये शहरांमध्ये दोन हजार हून अधिक भटके कुत्रे असून नागरिकांना तसेच वयोवृद्ध महिला शालेय विद्यार्थी व मोटार सायकल वाहन चालक किंवा वाहन चालवणे अशा नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार कठीण झाले आहे अनेक शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरी त्यांच्या अंगावरती हे कुत्रे येऊन भीतीचे वातावरण झाले आहे भटके कुत्रे असल्याने कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व्यक्तींना झोप न लागल्यामुळे त्यांचा परिणाम ब्लडप्रेशर वाढुन रुग्णालयात अशा प्रकारचे औषध उपचार करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयामध्ये इंजेक्शन घेऊन योग्य ते उपचार करावे लागत आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व नागरिकांच्या घरासमोर हे भटके कुत्रे जाऊन नैसर्गिक विधी शोष करून घाणीचे साम्राज्य दुकानदारांना व घरासमोरील नागरिकांना या भटक्या कुत्र्यांमुळे साफसफाई करावी लागत आहे व त्रास सहन करावा लागत आहे भटक्या कुत्र्यांची गेले वीस वर्षे नगरपालिके न करून कुत्र्यांची नसबंदी झाली नसुन त्यामुळे भटक्या कुत्र्यांची वाढ दिवसेंदिवस वाढत चालली आहे यामुळे वेळीच नसबंदी करून त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केल्यास या भटक्या कुत्र्यांमुळे होणारी उत्पत्तीला आळा बसणार आहे यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. देशात व महाराष्ट्रामध्ये व झोपडीत शिरुन सुद्धा चावा घेऊन अनेक नागरिक व त्याची लहान मुले मृत्युमुखी पडले आहेत ही घटना ताजी असताना अशी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व सावंतवाडी शहरांमध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे होऊ नये याची काळजी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने करावी यासाठी नागपूर व मुंबई इथल्या संस्थेने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी शासन निर्णयानुसार दर पत्रक देण्याचे माननीय मुख्याधिकारी यांना व माजी नगरसेवक यांना आश्वासन देऊन सांगितले असून त्यासाठी दोन हजार हुन कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी 30 लाखाची रूपयाची निधीची तरतूद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन मंडळातर्फे करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 8 =