You are currently viewing कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार उत्साहात

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार उत्साहात

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार उत्साहात

सहविचारी बैठकीसह स्नेहभोजनाचा कार्यक्रम; संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक उंचावण्याचा निर्धार

कसाल
कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या संस्थेअंतर्गत तीनही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी संस्थेचे संचालक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यानंतर संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचारी बैठक पार पडली. बैठकीत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्थेचा शैक्षणिक लौकिक अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीनंतर संस्थेच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे सर्व घटकांमध्ये आपुलकी व समन्वय अधिक दृढ झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेची ओळख असून, संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. भविष्यातही अधिक गुणवंत विद्यार्थी घडवून संस्थेचे नाव राज्य व देशपातळीवर उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्नशील असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा