You are currently viewing सिंधुदुर्ग भाजपात खांदेपालट, नवा अध्यक्ष १५ मे पूर्वी ठरणार…

सिंधुदुर्ग भाजपात खांदेपालट, नवा अध्यक्ष १५ मे पूर्वी ठरणार…

सिंधुदुर्गनगरी

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षपदासाठी १५ मे पर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोल्हापूर येथील प्रदेश सरचिटणीस महेश जाधव यांची निवड केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पक्षांतर्गत मत जाणून घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजप कार्यालयात काळसेकर यांच्यासह प्रदेश सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संध्या तेरसे, बंड्या सावंत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर काळसेकर यांनी आपल्या जिल्हा बँक उपाध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीची माहिती दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरचिटणीस सावंत यांनी पक्षात गेली ३० वर्षे सतत कार्यरत असलेले अतुल काळसेकर यांना राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी ही संधी माधव भंडारी यांना मिळाली होती, असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा