You are currently viewing मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द केला पूर्ण ; ग्रामस्थांनी मानले आभार

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यातील मंजूर झालेल्या विविध रस्त्यांची भूमिपूजने आज करण्यात आली. यामध्ये ओझर-कांदळगाव-मसुरे-आडवली रस्त्यासाठी १ कोटी ९६ लाख रु, मालवण बेळणा रस्त्यासाठी ३ कोटी २० लाख रु, त्याचबरोबर २५/१५ निधी अंतर्गत पेंडूर पराड दुर्गादेवी मंदिर रस्त्यासाठी ५ लाख रु, पेंडूर खरारे बस स्टॉप ते खरारे टेंबवाडी रस्त्यासाठी ५ लाख रु, पेंडूर खरारे मुख्य रस्ता ते सुनील सावंत घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रु. मोगरणे ते वेताळ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रु. हि कामे मंजूर करण्यात आली असून याची भूमिपूजने करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.


यावेळी कांदळगाव येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,विभागप्रमुख राजेश गावकर,माजी उपसरपंच रणजित परब, उपविभागप्रमुख अमोल वस्त, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, दीपक परुळेकर,अमोल परब, राघवेंद्र मुळीक,बाळा लाड, यशवंत कांदळकर, काका परब, प्रकाश परब, बाबी गुरव, तेजू आचरेकर, दीपक आंगणे,ओंकार पाटकर, स्वप्नील परब, अक्षता परब,
बिळवस येथे युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, शाखाप्रमुख बाबू पालव,उपशाखा प्रमुख रमेश फणसे,मसुरे सरपंच संदीप हडकर,मोहन पालव,सूर्यकांत पालव,शशांक माने,शरद गावडे,शाखा अधिकारी रमेश पालव,अशोक पालव,जयु गावडे,नामदेव राणे,चेतन पालव,सर्वेश सावंत,रवी सावंत,रुपेश सावंत
पेंडूर येथे उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विभाग प्रमुख अण्णा गुराम, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले,उपविभाग प्रमुख प्रदीप सावंत, पेंडूर सरपंच सुनीता मोरजकर, माजी उपविभाग प्रमुख रामू सावंत, वैष्णवी लाड, संदीप सावंत, शाखा प्रमुख बाबू कांबळी, दादा वायंगणकर, डॉ. सावंत, विष्णू लाड, निलेश हडकर, श्री. बागवे, संतोष परब, बाबू टेंबुलकर, शांती नाईक, सुभाष सावंत, बाबू गावडे, रवी गावडे, जयवंत गावडे,उदय गावडे,ओमकार गावडे,तन्मय गावडे,महादेव गावडे, अरुण नाईक,दीपक भोगले, सतीश गावडे,सहदेव गावडे,माधवी गावडे,अस्मिता गावडे,पल्लवी गावडे,जयश्री गावडे, स्नेहलता नाईक,अक्षता गावडे,नेहा गावडे,निशा गावडे,दिपाली गावडे,जयमाला गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 14 =