You are currently viewing सावंतवाडीत २५ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ आणि कॅरम खेळांचे मोफत सेमिनार

सावंतवाडीत २५ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ आणि कॅरम खेळांचे मोफत सेमिनार

सावंतवाडी

 

सावंतवाडी शहरात मुक्ताई ॲकेडमी आणि राणी पार्वती देवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी बुद्धिबळ आणि कॅरम खेळांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.

सेमिनार रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. सेमिनारसाठी नावनोंदणी ८००७३८२७८३ या मोबाईल क्रमांकावर करावयाची आहे. सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सेमिनारमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा