सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी रोटरी क्लब सावंतवाडी कडून व्हीलचेअर.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही रुग्णांना 24 तत्काल सेवा देतेच त्याचबरोबर गोरगरीब रुग्णांना लागणाऱ्या रुग्णपयोगी वस्तू वापरून परत करा या तत्त्वावर या संस्थेच्या माध्यमातून अशा वस्तू दिल्या जातात.
आणि याची दखल घेऊन शहरातील दानशूर व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या रुग्णपयोगी वस्तू एक मदत म्हणून सदर संस्थेला दान करतात.
आज रोटरी क्लब सावंतवाडी कडून नवी कोरी व्हीलचेअर रुग्णांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांना त्यांच्या संस्थेला दिली.
सदर व्हीलचेअर गोरगरीब रुग्णांसाठी त्यांना आवश्यक वेळी उपलब्ध करून दिली जाईल.
तरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की अशा संस्थेने किंवा दानशूर व्यक्तीने पुढे येऊन संस्थेला fowler bed उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून जिल्ह्यामधील अपघात झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी वापरायला देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याजवळ रुग्णपयोगी वस्तू जुन्या किंवा नवीन असतील तर त्या संस्थेला द्याव्यात जेणेकरून हजारो गोरगरीब रुग्ण याचा फायदा घेऊ शकतील.
रोटरी क्लब सावंतवाडी अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमाची दखल घेऊन हे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे तसेच त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. रोटरी क्लब नेहमीच जिल्हाभर आरोग्य संदर्भात अनेक उपक्रम राबवतात.
रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहेत.
याप्रसंगी रोटरी क्लब सावंतवाडी चे अध्यक्ष व नगरसेवक ॲड.सिद्धार्थ भांबुरे, सचिव सिताराम तेली, अनंत उजगावकर, आनंद रासम,तोरस्कर प्रवीण परब, दयानंद गवस,कवी सुधीर धुमे, जितू पंडित, अभय पै, कवी दीपक पटेकर व व्हीलचेअर स्वीकारताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम उपस्थित होते.
