You are currently viewing गोरक्षक सिंधुदुर्ग व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

गोरक्षक सिंधुदुर्ग व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरक्षक सिंधुदुर्ग आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात महिला रक्तदात्यांसहीत

इतर रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदान केले.

यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंदजी गवस सर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, निमंत्रित सदस्य दीपक पटेकर, कार्यकारणी सदस्य तथा गोरक्षक संघाचे दिनेश गावडे, सदस्य मंगेश माणगावकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत, गोरक्षक सिंधुदुर्गचे अध्यक्ष साईराज नार्वेकर, कृष्णा धुळपणावर, स्वागत नाटेकर, अखिल मांजरेकर, गुरुप्रसाद मिशाळ, अथांग वाळके, लोकमान्य मल्टीपर्पजचे ऋषिकेश सावंत व सूर्यकांत गावडे, रुपेश कुडतरकर, कोमल मेस्त्री, मानसी घोगळे, मंगेश घोगळे आदी उपस्थित होते.

गोरक्षक सिंधुदुर्ग व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या संपूर्ण टीमने हे रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा