You are currently viewing कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त आनंदी गाव संकल्पना…

कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त आनंदी गाव संकल्पना…

ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांची माहिती

किर्लोस्कर समुहाचे संजय किलोस्कर महोत्सवात उपस्थित राहणार

कणकवली

नैसर्गिक शेतीमधूनच शाश्‍वत रोजगार निर्मिती तसेच समृद्ध आणि आनंदी गाव ही संकल्पना सिंधुदुर्गात रुजविली जाणार असल्याची माहिती किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक, माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला किर्लोस्कर समुहाचे संजय किर्लोस्कर उपस्थित राहणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांच्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, सल्लागार बाळू मेस्त्री, मंगेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.
श्री.सावंत म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन १७ फेब्रुवारीला होईल. यात सकाळच्या सत्रात शिवारफेरी आणि त्यानंतर उद्घाटन कार्यक्रम होईल. किर्लोस्कर समुहाचे प्रमुख संजय किर्लोस्कर यावेळी प्रमुख असणार आहेत. याखेरीज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ते म्हणाले, रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात समृद्ध आणि आनंदी गाव, शाश्वत नैसर्गिक शेती, फळप्रक्रीया, औद्योगिक समूह संकल्पना, नैसर्गिक शेती, खत व्यवस्थापन अशा विविध विषयावर परिसंवाद होणार आहेत. याखेरीज रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान केंद्रांमध्ये फळप्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील ५२४ बचत गटातील महिलांना रोजगार देण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 2 =