सावंतवाडी :
सध्या सर्वच रक्तपेढयामध्ये रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे माजगाव मित्रमंडळ, माजगाव ता. सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी दि. २८ जून २०२६ रोजी माजगाव हायस्कूल, माजगाव तालुका सावंतवाडी येथे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सदर रक्तदान शिबीर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र उर्फ जितू गावकर यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केले आहे.*_
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन बहुमोल असे रक्तदान करावे, ही विनंती.
_*इच्छुक रक्तदात्यांनी गिरीश सावंत (9326611071), ओंकार सावंत (8554045693), सुरज सावंत (9405699818), प्रशांत मेस्त्री (9049441622) तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे (8390905269) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (9422967249) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.*_
_*रक्तदात्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावी ही विनंती*_
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfgsmQaoua2gAi2zzLFqmC_OUla-IBYNyptpC6VVdb8P5vLzA/viewform?usp=header
*कृपया रक्तदात्यांनी वरील गुगल फॉर्म भरून रक्तदानासाठी येण्याचे निश्चित करावे, म्हणजे आयोजकांना नियोजन करणे सोपे होईल. धन्यवाद.*
