You are currently viewing शोधतोय मी आरसा
Oplus_16908288

शोधतोय मी आरसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शोधतोय मी आरसा* 

 

शोधतोय मी आरसा

मनाचे प्रेमाचे आत्म्याचे

चिंतन करणारा….

 

शोधतोय मी आरसा

आचार विचार संस्कारांना

दिशा देणारा…

 

शोधतोय मी आरसा

सत्य असत्य खऱ्याखोट्याचे

प्रमाण ठरविणारा…

 

शोधतोय मी आरसा

जन्म मृत्यूच्या अंतरातील

प्रवासाच्या रहस्याचे

आकलन करणारा…

 

शोधतोय मी आरसा

अहं सोहं कोण आहे

याची जाणीव करून देणारा…

 

शोधतोय मी आरसा

माझ्या चेहऱ्याच्या

आणि दृष्टीच्या पाठमोरे

दृश्य दाखवणारा…

 

शोधतोय मी आरसा…

शोधतोय मी आरसा…

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा