You are currently viewing शिवसेना महिला सेनेच्या कुडाळ-मालवण तालुका प्रभारीपदी पुनम चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना महिला सेनेच्या कुडाळ-मालवण तालुका प्रभारीपदी पुनम चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना महिला सेनेच्या कुडाळ-मालवण तालुका प्रभारीपदी पुनम चव्हाण यांची नियुक्ती

पक्षसंघटन बळकटीसाठी महत्त्वाची जबाबदारी; महिला संघटन वाढविण्यासाठी काम करण्याचा निर्धार

मालवण

शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मालवण येथील सक्रिय कार्यकर्त्या व पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम नागेश चव्हाण यांची शिवसेना महिला सेना कुडाळ-मालवण तालुका प्रभारी म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुनम चव्हाण या कुडाळ व मालवण तालुक्यात महिला सेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून पुनम चव्हाण या आगामी काळात दोन्ही तालुक्यांतील महिलांचे संघटन अधिक बळकट करतील. सर्व महिला भगिनी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी त्या जोमाने कार्य करतील, असा विश्वास महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमलकर, विद्या फर्नांडिस, सौ. प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर, अक्षता गावडे आदी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा