*मुंबईत पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन; कौशल्यविकास व माध्यम नैतिकतेवर भर*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि झुंजार लेखणी यांच्या वतीने तसेच विशेष सहयोग मैत्री संस्था यांच्या सहभागाने पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच मुंबई मराठी पत्रकार संघ, लोकमान्य सभागृह, महापालिका मार्ग, आझाद मैदानाजवळ, सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), व्ही.टी. रेल्वे स्टेशनसमोर, मुंबई येथे उत्साहात पार पडले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पत्रकारितेतील व्यावसायिक कौशल्यविकास, नैतिक मूल्यांची जाणीव आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हेमंत सामंत, वरिष्ठ पत्रकार व लेखक उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. अक्षय आंबेडकर (राज्यशास्त्र व संविधान अभ्यासक) आणि लेखिका डॉ. सुमन नवलकर उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथींमध्ये इतिहास अभ्यासक संभाजी राजे जाधवराव, विलास खानोलकर (माजी सदस्य, फिल्म सेन्सॉर बोर्ड, भारत सरकार), तसेच दत्ताराम घुगे आणि संतोष आंबेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. संयोजन सुरज भोईर यांनी केले, तर सहसंयोजन संतोष धुरंधर (झुंजार लेखणी) यांनी केले.
या कार्यशाळेस माणुसकी फाउंडेशन, साप्ताहिक युवक आधार, मराठी साहित्य व कला सेवा तसेच विश्वांकुर यूट्यूब चॅनेल यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील व्यावसायिक कौशल्यविकास, माध्यम नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेमुळे पत्रकारितेत व्यावसायिक कौशल्यविकास अधिक दृढ होईल तसेच माध्यम नैतिकतेबाबत व्यापक जनजागृती निर्माण होईल, असा विश्वासही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश जाधव, संतोष खरटमोल, सूर्यकांत चव्हाण, ॲड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, राजेश जाधव, घनश्याम आंबोकर, ॲड. आदिती गायकवाड, विजय काकडे, साई रामपूरकर, दिलीप गाडेकर, डॉ. संतोष कांबळे, संजय ताटे, डॉ. प्रभाकर कांबळे, विकास कदम आणि जनसेवक संतोष भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले
_________________________
*संवाद मीडिया*
*संपूर्ण देशात आणि परदेशात गेली 18 वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
https://sanwadmedia.com/206167/
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
– १०० % प्लेसमेंट.
– परदेशात नोकरीच्या संधी.
– ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
– संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
– अनुभवी अध्यापक वर्ग.
👉*(OBC,SBC,NT,SC ,ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
पत्ता – प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
*📱संपर्क क्रमांक : 9420156771/9145623747/7887561247*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206167/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
