*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”युगपुरुष डॉ.हेडगेवार”*
युगपुरुष आहेत डॉक्टर हेडगेवार
शिकवती प्रखर राष्ट्रप्रेम निरंतरIIधृII
सहभागी होते स्वातंत्र्य चळवळीत
व्यक्तिमत्व तेज संपन्न देशभक्ती प्रेरित
आश्वस्त करिती देशाला स्वातंत्र्य मिळणारII1II
वैभव सामर्थ्यशाली व्हावा भारत उन्नत
दूरदृष्टी असलेले प्रखर देशभक्त
उज्वल भवितव्याचे सदा करती विचारII2II
स्वयंसेवक घडवती ठेवणारे समाजभान
प्रज्ञा समता सामर्थ्य जपती चिरंतन
शिकवती हिंदू संघटित देशाचा मूलाधारII3II
संघाचे कार्य मूलभूत देशार्थ समर्पण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापिला कार्यार्थ
सांगती समर्पितता राष्ट्रजीवानाधारII4II
संघ विचार जाळे पसरले विविध क्षेत्रांत
संघ प्रचारक बने राष्ट्रभक्ती मुशीतून
ब्रीद जपतो राष्ट्रनीती संघ निरंतरII5II
मंत्र छोटा तंत्र सोपे रीत साधी बांधि शिस्त
प्रेरणा देती विजीगीषु समाज व्हावा उन्नत
स्वयंसेवक संकटी धावे विसरे घरदारII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
