नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात भव्य रक्तदान शिबिर
मच्छीमारांसाठी विविध शासकीय योजनांवर विशेष मार्गदर्शन; २१ जून रोजी जामसंडे येथे आयोजन
देवगड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री Nitesh Rane यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी देवगड मंडलाच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जामसंडे येथील Moreshwar Janardan Gogate Sanskrutik Bhavan येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन भाजपा देवगड मंडलाचे अध्यक्ष सदाशिव (राजा) भुजबळ यांनी केले आहे.
याचवेळी मच्छीमार बांधव तसेच मासेमारी व्यवसायाशी संबंधित महिला व पुरुषांसाठी विविध कल्याणकारी योजनांबाबत विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ लाख रुपयांचे निःशुल्क विमा संरक्षण, एनएफडीपी (National Fisheries Development Portal) पोर्टलवर निःशुल्क नोंदणी, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, सिंधुरत्न योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड सुविधा, मत्स्य व्यवसायासाठी वीज दरातील सवलतींबाबत माहिती तसेच नौका नोंदणी, परवाना आणि अन्य कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मत्स्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित मच्छीमार बांधव, भगिनी तसेच मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांनी या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी देवगड मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक मोबाईल क्रमांक तसेच वारसदाराची माहिती (वारसाचे आधार कार्ड व पॅन कार्ड) यांसह आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
