वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के
कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडीची विद्यार्थीनी कु. संपदा पुजारी ९३.५० गुण मिळवत तालुक्यात प्रथम
वैभववाडी
वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के इतका लागला आहे. वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. संपदा यशवंत पुजारी हिने ९३. ५० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तर कु. श्रेया देवजी पालकर हिने ९१. १७ टक्के गुण ( वाणिज्य )मिळवत व्दितीय तर विज्ञान शाखेची कु. मानसी मुकुंद शिनगारे हिने ८६ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. पहिले तीनही क्रमांक यंदा कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यांनी पटकाविले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रवारी २०२५ उच्च माध्यमिक परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातून एकूण ३२९ विद्याथी बसले होते. त्यापैकी ३२८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
कनिष्ठ महाविद्यालय निहाय निकाल पुढीलप्रमाणे..
कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडीच्या तिन्ही शाखेतून एकूण २०७ विद्यार्थी बसले होते. या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक- संपदा यशवंत पुजारी ९३. ५० टक्के, द्वितीय क्रमांक – कु. श्रेया देवजी पालकर ९१. १७ टक्के, तृतीय क्रमांक – तनिष्का तावडे हिने ८४.६७ टक्के,
विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक – कु. मानसी मुकूंद शिनगारे ८६ टक्के, द्वितीय क्रमांक – कु. प्राची औदुंबर तळेकर ८४. १७, तृतीय क्रमांक कु. साक्षी प्रविण भोसले ८३. ८३ टक्के,
कला शाखेतून प्रथम क्रमांक – कु. संचित मिलिंद जाधव ७१. १७ टक्के, द्वितीय क्रमांक – कु. प्राची दिपक पांचाळ ७०. ३३, तृतीय क्रमांक – प्रीती दयानंद गुरव ७०. १७ टक्के,
छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या विद्यालयातून परीक्षेला एकूण १९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. या विद्यालयाचा एकूण निकाल ९६ टक्के लागला आहे. विद्यालयातून
प्रथम क्रमांक – कु. सिद्धेश यशवंत सुतार ७१. ८३ टक्के, द्वितीय क्रमांक – कु. ऋषभ भिवाजी घाटकर ६६.६७ टक्के, तर तृतीय क्रमांक – कु. सायली संजय गुरव ६४. ८३ टक्के.
आचिर्णे आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज आचिर्णे या काॅलेजमधून एकूण ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक – कु. पार्थ विलास पाताडे ७९. ८३ टक्के, द्वितीय क्रमांक – कु. नुरनिशा गौस बोबडे ७७. ५० टक्के, तृतीय क्रमांक – कु. सिद्धी गोविंद गावडे ७५. १७ टक्के.
तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक – समीक्षा अनंत चंदुरकर ८०. ६७ टक्के, द्वितीय क्रमांक तनिष्क अमित खानविलकर ७७. १७टक्के, तृतीय क्रमांक – सिद्धी वासुदेव झोरे ७४.८३ टक्के, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.