You are currently viewing असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणांचा शुभारंभ

असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणांचा शुभारंभ

असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणांचा शुभारंभ

 सिंधुदुर्गनगरी

 केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणारी नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) ही दोन महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणे जिल्ह्यात सुरू होत असून डिसेंबर 2026 पर्यंत चालणार आहेत. या सर्वेक्षणांचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दि. 17 जून 2026 रोजी करण्यात आला असून या सर्वेक्षणातून जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे चित्र समोर येणार असून नागरिकांनी सर्वेक्षण पथकांना अचूक माहिती देउन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

                अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, (नियोजन विभाग) यांच्यामार्फत प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) ही दोन सर्वेक्षणे करण्यात येत आहेत. PLFS व ASUSE अंतर्गत जिल्हातील प्रत्येकी 48 घटकांची क्षेत्रकामासाठी निवड केली आहे. जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. जिल्हास्तरीय रोजगार, बेरोजगार आकडेवारी, असंघटीत क्षेत्रातील उद्योगांची संख्या, तसेच रोजगार निर्मिती इत्यादी सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे. या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे प्राप्त होणारी माहिती शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व धोरणे निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून त्यासाठी नागरिकांनी प्रगणकांना अचुक माहिती द्यावी, असे आवाहन‍ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

            नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) देशातील रोजगार व बेरोजगारीची स्थिती, महिला कामगार सहभागाचे प्रमाण, स्वयंरोजगार इ. विषयक अद्ययावत माहिती उपलब्ध करून देते. तर असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) असंघटित क्षेत्रातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योग आस्थापनांची संख्या, रोजगार, उत्पादनक्षमता आणि इतर आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित करते. या सर्वेक्षणांतून उपलब्ध होणारी माहिती राज्य व जिल्हास्तरावरील विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध धोरणे निश्चित करण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

            सर्वेक्षणाचे क्षेत्रीय कामकाज  आय पीएसवोएस रिसर्च, मुंबई या संस्थेमार्फत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडलेल्या कुटुंबांना तसेच उद्योग आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतीच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि संबंधित आस्थापनांनी अचूक व आवश्यक माहिती देऊन या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा