You are currently viewing अरूपाचे रूप

अरूपाचे रूप

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अरूपाचे रूप*

•••••••••••••••••••

काहीही असो मनांतरी

तुझीच आठवण आहे

 

माझा कसला दावा नाही

तुलाच काय वाटते आहे

 

भावनांच्या सरिसरितुनी

अंतरी तुझाच स्पर्श आहे

 

सांग काय कसे व्यक्त व्हावे

निःशब्दी आगळे सुख आहे

 

चौफेर साराच भास तुझा

जणु प्रीतीचा गंधाळ आहे

 

निळ्यासावळ्या आभाळी

अरूपाचे सुंदर रूप आहे

•••••••••••••••••••••••••••••

*@वि.ग.सातपुते.(भावकवी)*

प्रतिक्रिया व्यक्त करा