You are currently viewing को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन

को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन

“विद्यार्थ्यांच्या ‘जिज्ञासापूर्तीसाठी’ शिक्षकांनी घेतलेली मेहनत हीच खरी अध्यापन प्रक्रिया!” – सुरेश ठाकूर

मसुरे :

केंद्रशाळा मसुरे नं. 1 चे शिक्षक व साने गुरुजी कथामाला मालवणचे सदस्य श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कथामाला मालवण व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवराज सावंत, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, ज्योती पेडणेकर, मयुरी शिंगरे, शिक्षक गोपाळ गावडे,विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, हेमलता दुखंडे,
विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

साने गुरुजी कथामाला मालवणने राबविलेल्या ‘कथा सांगू आनंदे- विज्ञान कथा’ या उपक्रमाने प्रेरीत होवून आपल्या विध्यार्थांना भारतीय शास्त्रज्ञांची कथारुप माहिती व्हावी या हेतूने गुरुनाथ ताम्हणकर यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तिकेत जयंत नारळीकर, मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, आर्यभट्ट, विजय भटकर, होमी भाभा, विक्रम साराभाई, रामानुजन, व्यंकट रामन या भारतीय शास्त्रज्ञांची चित्रे, चरित्रे, प्रसंग समाविष्ट आहेत.

“ही आठ भारतीय संशोधकांची छोटी चरित्रे वाचून मुलांना भविष्यात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. हळूहळू त्यांना स्वतःलाच या विषयात झोकून द्यावसं वाटेल. तो क्षण आणि तो दिवस गुरुनाथ ताम्हणकरांचा ‘सोनियांचा दिनु’ असेल यात शंकाच नाही, आणि तोही लवकरच उगवेल! खरोखरच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास अशा पुस्तिका मार्गदर्शक ठरतील. ह्या आठ छोट्या चरित्रांच्या वाचन, मनन आणि चिंतनातून मुलांच्या आणि पालकांच्या मनावर वैज्ञानिकांची आठ सुंदर लेणी कोरली जातील, हे तर निश्चितच! पण त्यासोबतच माझ्या शाळेने, माझ्या शिक्षकांनी आणि आपल्या कथामालेने संपादित केलेले हे पहिले पुस्तकलेणे जे मुलांच्या मनावर कोरले जाईल, त्यांचे सौंदर्य कैलास लेण्याचेच असेल!” असे प्रतिपादन सुरेश ठाकूर यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तक प्रकाशनाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. संस्कृती मसुरेकर हिने केले. यावेळी कु. मानसी पेडणेकर व कु. श्रेया मगर यांनी या पुस्तकातील विज्ञानकथा सांगितल्या. कु. आदित्य मेस्त्री याने ‘शिवरायांवरील पोवाडा’ सादर केला. कु. यशश्री ताम्हणकर हिने पुस्तकाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.

या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी ताम्हणकर यांचे अभिनंदन केले. आभार विनोद सातार्डेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 16 =