*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*
*बैठकीच्या दरबारी*
विडा बनारसी पानात गुलकंद लई भारी
यावं सरकार बसा की बैठकीच्या दरबारी||धृ||
सजलाय दरबार झुंबर तोरणं रोषणाईनं
बसायला मखमली गालीचा सुगंधी इत्रानं
संगीत साज बैठकीला समोर बसली सुंदरी
यावं सरकार बसा की बैठकीच्या दरबारी ||१||
नटूनथटून आली नार करून सोळा श्रृंगार
चाल गजगामिनीची पायात पैंजणांचा भार
पारखून घ्या नजरेत एक एक अदाकारी
यावं सरकार बसा की बैठकीच्या दरबारी ||२||
सळसळती ज्वानीची नशा अंगात उभारी
नजरेचा तीर भल्याभल्यांना घायाळ करी
भरजरी शालू पैठणी नेसले नऊवारी
यावं सरकार बसा की बैठकीच्या दरबारी ||३||
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
