पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती .
वेंगुर्ले
पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात आली .तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका अँड. सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर कार्य करुन एक नवा विक्रम स्थापित केल्याचे सांगितले .
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे केंद्र सरकार हे सनातनी धर्माचे पुरस्कर्ते असल्याने ५०० वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिरांची उभारणी झाली .जगाच्या नकाशावर भारताचे विकसनशील स्थान अधोरेखित केले . ह्या एक तपामध्ये मोदीजींनी राष्ट्र प्रगतीपथावर नेले . तसेच हिंदुस्थान परम् वैभवशाली बनविण्यासाठी मोदीजी दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले .
यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , युवा मोर्चाचे नगरसेवक प्रणव वायंगणकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , नगरसेवक सचिन शेटये , नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक रविंद्र शिरसाठ , नगरसेवक सदानंद गिरप , नगरसेवक विनु मोर्डेकर , माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , नगरसेवीका आकाक्षा परब , नगरसेवीका रिया केरकर , नगरसेवीका काजल कुबल, नगरसेवीका गौरी माईणकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , विनय गोगटे , नाना महाजन, किरण मेस्त्री , तसेच वारकरी संप्रदायाचे किशोर रेवंणकर , गजानन कुबल , दिलीप कुर्ले, सुभाष कुर्ले , रामकृष्ण डिचोलकर , सहदेव गिरप, अंकुश वराडकर , गोपीनाथ म्हाकले , महानंदा मयेकर , गौतमी कुबल , लता खोबरेकर , दुर्गा कुबल , जोस्ना कुबल , महेंद्र पालव , संजय गिरप व कुबल सर उपस्थित होते .
