You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ग्रेट भेट!’

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ग्रेट भेट!’

*मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ग्रेट भेट!’*

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या जिल्ह्यातील प्रतिथयश शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी एक अनोखी ‘ग्रेट भेट’ अनुभवण्यास मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले देखील उपस्थित होते.प्रत्यक्ष मा.जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता आल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा