You are currently viewing चाहूल – दुष्काळाची
Oplus_16908288

चाहूल – दुष्काळाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चाहूल – दुष्काळाची*

 

पावसा तू यंदा

का नाही आलास?

तू नाही आलास

आमच्यावर का रुसलास?

 

तू नाही बरसला म्हणून

आमचे डोळे पाणावले

थेंब थेंब डोळ्यातून

आता अश्रू वाहू लागले

 

टक लावून पहात होतो

ढग दिसतील आभाळाले

ते ही कधीमधी आले

थेंब न गाळता निघून गेले

 

प्रश्न सारे उरात ठेऊन

वाट पाहिली उत्तराची

प्रश्न आता वाढत चालले

सरली आशा स्वातीची

 

दाणा नाही पाणी नाही

दुष्काळाची लागली चाहूल

लाकडे चुल्यात जळत आहे

भाकरीने केली दिशाभूल

 

संपला आता पैसा अडका

संसार गाडा रेटू कसा

जीव झाला कासावीस

कोरडा पडू लागला घसा

 

जीव मुठीत घेऊन जगीन

पुढल्या साला पावतं

तुझ्या शिवाय जगणं कठीण

तुझ्या वाचून मरण येतं

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा