*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खरंच उलटली यांची साठी*
ऐकून कोणी निसर्ग हाक
करील का *हो दुर्लक्ष*
रोज पहातो बेछूट कत्तल
बदली मोजून “रुपये लक्ष”
1
मिळेल का हो *प्राणवायू*
बदली मोजून रुपये हजार
नोटेसाठी सुद्धा लागतात
कापावी झाडे हिरवीगार
2
कशी कळावी वृक्ष वेदना
बिन हृदयाच्या माणसाला
येईल जेव्हा प्राण कंठाशी
सिलींडर न मिळतो हुंगाला
3
बंगल्या साठी देत आहुती
मरतो कां कोणी मंत्रीसंत्री
कापून काढती वृक्ष दिवसा
कुणी हरामी चांदण रात्री
4
भकास करुनी जुनी जंगले
खड्डा खणतात स्वत:साठी
कुठे ठेवली *मती गहाण*
खरच उलटली यांची साठी
5
विनायक जोशी🖋️ ठाणे
मोबाईल/9324324157
