You are currently viewing सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे कृष्णा धुरींची जनमानसात वेगळी ओळख- वैभव नाईक

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे कृष्णा धुरींची जनमानसात वेगळी ओळख- वैभव नाईक

*सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे कृष्णा धुरींची जनमानसात वेगळी ओळख- वैभव नाईक*

*शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा वाढदिवस काल वाडोस येथील अन्नपूर्णा हॉल येथे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृष्णा धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने मोरे येथील मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला. वाढदिवस कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कृष्णा धुरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळत असतानाच राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात ते कायम ॲक्टिव्ह असतात. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत दुसऱ्या मतदारसंघातही त्यांना चांगली मते मिळाली. पुढच्या वेळी ते नक्कीच विजयाचा गुलाल उधळतील असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पं.स. गटनेते योगेश धुरी, माणगाव उपसरपंच बापू बागवे,माणगाव विभागप्रमुख एकनाथ धुरी, घावनळे विभाग प्रमुख पिंट्या उबारे,दादा तामाणेकर,पप्पू महाडेश्वर,शैलेश विर्नोडकर, कांचन घाटकर,सचिन ठाकूर,दत्ताराम लाड,सचिन भिसे,दीपक धुरी,भाऊ सावंत,रुपेश जाधव,रितेश परब,निलेश गाड,विजय परब, सत्यविजय कविटकर,प्रकाश बांदेलकर, निलेश सावंत,रसिक परब,संग्राम घोगळे,गणेश पालव, योगेश पालव, धोंडी राऊळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा