You are currently viewing सावंतवाडीत शनिवारी  महाआरोग्य शिबिर..

सावंतवाडीत शनिवारी महाआरोग्य शिबिर..

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर..

 

सावंतवाडी :

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी सकाळी ठीक दहा वाजता काझीशहाबुद्दीन हॉल एसटी स्टँड समोर प्रांत ऑफिस कार्यालयानजीक महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला खेमसावंत महाराजे भोसले व श्रीमती शुभादेवी यांच्या शुभहस्ते उद्घाटनाचे फीत कापून व श्रीफळ वाढवून त्यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर हृदयविकार व मधुमेह किडनीचे आजाराचे तज्ञ, कॅन्सर तज्ञ,अस्थिरोग तज्ञ व जनरल सर्जन उपस्थित राहणार असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा

या महाआरोग्य शिबिरात आजाराचे निदान झाल्यानंतर पुढील शस्त्रक्रिया कोल्हापूर अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर येथे मोफत शस्त्रक्रिया, औषधे, जेवण व एसटी प्रवास खर्च यांचा लाभ मिळणार असून यासाठी पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा, सफेद रेशनिंग कार्ड तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व पॅन कार्ड, बँकेचे फोटो पासबुक यापैकी एक आवश्यक आहे.

असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + seven =