२ नव्या फेस्टिव्हल गाड्या २३ तारखेपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

२ नव्या फेस्टिव्हल गाड्या २३ तारखेपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

 

नागपूर – मडगाव तसेच पुणे मडगाव  या गाड्यांचा समावेश !

सिंधुदुर्ग:

कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार आहेत. नागपूर – मडगाव तसेच पुणे मडगाव या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे २३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार आहेत.

दसर्‍याच्या पाश्‍वर्र्भूमीवर कोकणात येणार्‍यांच्या सोयीसाठी या दोन विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यातील नागपूर – मडगाव मार्गावरील विशेष गाडी (०१२३५/०१२३६) नागपूर स्थानकावरून दि. २३ व ३० ऑक्टोबर, तसेच ६ नोव्हेंबर  या तारखांना सायंकाळी ४ वा. सुटणार असून, दुसर्‍या दिवशी ती गोव्यात मडगावला सायंकाळी ४ वा. ४० मिनिटांनी पोहचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून दि. २४, ३१ ऑक्टोबर तसेच ७ नोव्हेबरहून सायंकाळी ७ वा. ४० मिनिटांनी सुटेल आणि नागपूरला ती दुसर्‍या दिवशी रात्री ८ वा. ३० मिनिटांनी पोहचेल.

वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ नाशिक, इतगपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

दुसरी फेस्टीवल स्पेशल गाडी (०१४०९/०१४१०)पुणे – मडगाव मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुण्याहून २३ ,३० ऑक्टोबर तसेच ६  नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. ४५ मिनिटांनी सुटणार असून लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवीम तसेच करमाळी या स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी देखील वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची पूर्णपणे आरक्षित असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा