You are currently viewing कोल्हापुरातील दूध कंपनी विरोधात सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी-संस्थाचालक आंदोलन छेडणार – एम.के.गावडे

कोल्हापुरातील दूध कंपनी विरोधात सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी-संस्थाचालक आंदोलन छेडणार – एम.के.गावडे

२ कोटी ७७ लाख थकबाकी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून शासनाचे लक्ष वेधणार…

वेंगुर्ले

कोल्हापूर-कोडोली येथील एका दूध कंपनीकडे सिंधुदुर्ग दूध उत्पादक सहकारी संस्थांची २ कोटी ७७ लाख थकबाकी आहे. त्यामुळे शेतकरी, दूध संस्था व वाहतूकदार अडचणीत आले असून गरीब शेतकऱ्यांना आपली जनावरे विकून बँकेचे हप्ते भरावे लागत आहेत. मात्र याकडे शासन लक्ष देत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, संस्था चालक यांच्या वतीने १६ नोव्हेंबरला सकाळी १०:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष एम.के. गावडे यांनी दिली. दरम्यान या आंदोलनात जास्तीत-जास्त दूध उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही

त्यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोल्हापूर कोडोली येथील एका दूध कंपनीकडे थकबाकी असलेले सिंधुदुर्ग दूध उत्पादक सहकारी संस्था यांचे २ कोटी ७७ लाख रुपये अनेक प्रयत्न करूनही मिळाले नाहीत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार अडचणीत आले आहे. पर्यायाने जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे व्यवहारही अडचणीत आले आहेत. गरीब शेतकऱ्यांना आपली जनावरे विकून बँकेची देणी द्यावी लागत आहेत.
या सर्व परिस्थिती मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्ध विकास मंत्री सुधीर केदार, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकरी, संस्था चालक यांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकरी व संस्था चालक यांनी या उपोषणात सहभागी व्हावे, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =