मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण येथे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिनची देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८८ वे सत्र दिनांक १ जुलै पासून ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या कालावधी सुरु होत आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग – मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांनी दि. ३० जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र.ग. मालवणकर यांनी केले आहे.
प्रशिक्षण कालावधी :- दिनांक १ जुलै ०२६ त ३१ डिसेंबर २०२६
आवश्यक पात्रता :- उमेदवारांचे वय १८ ते ३५ असावे (आधार कार्ड व रेशन कार्डची छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाकिंत प्रत जोडणे आवश्यक), क्रियाशील मच्छिमार असवा ( विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी), उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण शुल्क :- सहा महिन्याचे रु. २ हजार ७०० मात्र, द्रारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु ६०० मात्र ( दरिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक).
रोजगारा, स्वयंरोजगाराचा संधी :- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगारांची संधी उपलब्ध होवू शकते.
तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ३० जून २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात सादर करावेत.
अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग-मालवण यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४२२२१६२२० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
