You are currently viewing संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा सत्कार संपन्न 

संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा सत्कार संपन्न 

अमरावती :

येत्या 6 जून रोजी दुपारी 12 वाजता शिव राज्याभिषेक दिनानिमित्त अमरावतीच्या अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट मध्ये होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी तसेच अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा अमरावतीला होणाऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा सत्कार अहिल्यानगर येथील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष विद्याधर काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अहिल्यानगर येथील राष्ट्रीय पाठशाला हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सत्काराला माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती हर्षदा ताई काकडे पंचायत समिती माजी सभापती श्री बापूसाहेब भोसले ऍड. सुभाष भोर प्रा. रामराजे लाखे भगवान राऊत अशोक नवल व जयराम सुडके लक्ष्मण विटाळ हे उपस्थित होते.

श्री आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष काकडे यांनी शाल श्रीफळ व पुस्तक देऊन श्री भापकर यांचा सत्कार केला.

श्री पुरुषोत्तम भापकर हे आदर्श सनदी अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील आपल्या प्रशासकीय कामाबरोबरच साहित्य चित्रपट सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमात सातत्याने भाग घेतला आहे. त्यांनी विपुल लेखन केले असून ते पुस्तक रूपाने लोकांसमोर आले आहेत. त्यांच्या जीवन पटावर पुरुषोत्तम नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.एक लोकाभिमुख आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. अमरावतीला दिनांक 6 जून रोजी दुपारी बारा वाजता शिकची रिसॉर्टमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाल्यामुळे सर्वत्र अभिनंदना चे वातावरण तयार झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा