सावंतवाडी :
सातार्डा येथील निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत उद्या सोमवार दि. २५ रोजी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, बहीण, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचे ते वडील होत.
