सैनिक मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथे प्रवेश अर्ज सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह कार्यान्वित आहे. या वसतिगृहाची क्षमता ६० मुलांची आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० जुन २०२६ अशी आहे. जिल्ह्यातील इच्छुक शहिदांच्या वीरपत्नी/ माजी सैनिक/सेवारत सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी व त्यांची अनाथ पाल्ये यांनी लाभ घ्यावा. सैनिकी पाल्यांना प्रवेशाचे प्रमाण कमी झाल्यास इतर नागरिकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रवेशासाठी दरमहा शुल्क निश्चित करण्यात आले असून सेवेत असलेल्या सैनिकांच्या अधिकाऱ्यांसाठी ३,५०० रुपये, जे.सी.ओ. साठी ३,००० रुपये व शिपाई, एनसीओसाठी २,८०० रुपये असे शुल्क आहे. माजी सैनिकांसाठी अधिकारी व ऑननरी रँक रु. ३,०००, जे.सी.ओ.रु. २,८०० व शिपाई एनसीओ २,५०० रुपये दर ठरविण्यात आला आहे. शहीदांच्या वीरपत्नी माजी सैनिक विधवा, अनाथ व अपंग पाल्यांना मात्र नि:शुल्क सुविधा देण्यात येणार आहे. इतर नागरिकांसाठी शुल्क ३,५०० रुपये राहणार आहे.
प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम रु. १०००/- आकारण्यात येईल, प्रवेश अर्ज सैनिक मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथे उपलब्ध आहेत.
वसतिगृह प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल. शहिदांच्या वीरपत्नी/माजी सैनिक विधवा, माजी सैनिकांची अनाथ व अपंग पाल्य. माजी सैनिकांचे पाल्य. सेवारतर सैनिकांचे पाल्य. जागा उपलब्ध असल्यास इतर नागरीक पाल्य. तरी पात्र शहिदांच्या विरपत्नी,माजी सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0 23 62 -22 88 20 /84 46 37 15 84 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
