You are currently viewing एक चहाचा कप
Oplus_16908288

एक चहाचा कप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*एक चहाचा कप*

त्या थंड सकाळी
तू अजूनही आठवणीत होतास
आणि हातात धरलेला
चहाचा कप शांत उभा होता

वाफ उठत होती हळूहळू
जणू तुझं नाव कुजबुजत
आणि त्या गरम घोटात
मी स्वतःला शोधत बसत

तू नसतानाही
सवय तुझी सोबत होती
चहा मात्र निमित्त होत
तुझी उणीव भरून काढण्याची

त्या कपाच्या काठावर
तुझ्या हसण्याचा भास दाटतो
प्रत्येक घोटासोबत
मन तुझ्याकडेच परत जात

एक चहाचा कप
आणि त्यात साठलेलं तू
न बोललेलं सगळं काही
त्या वाफेत विरघळून जातं…

संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा