You are currently viewing गणपती आराधना

गणपती आराधना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य ग्रुप सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.शोभा वागळे यांची गणेश जयंती निमित्त केलेली काव्यरचना*

*गणपती आराधना*

शुभ कार्या सुरुवात
वंदू चला गजानना
यश ते मिळे कार्यात
स्मरू पार्वती नंदना.

आज गणेश जयंती
गणपती जन्मोत्सव
रम्य सोहळा मंदिरी
होई मोठा महोत्सव.

शिव पार्वती नंदन
गजानन गणपती
गजमुखी लंबोधर
मायबाप विद्यापती.

विघ्नेश्वर गजपती
सकलांचा सूखकर्ता
भक्त जना संकटांचा
तोच एक दुःख हर्ता.

मोदकांचा तो नैवेद्य
भारी प्रिय गणेशाला
आरतीने गुण गाऊ
आळवुया मोरयाला.

गणपती आराधना
करू चला लोक हिता
व्हावू शब्दांची सुमने
शुभ कल्याणा करिता.

शोभा वागळे
मुंबई
०४/०२/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 4 =